मुंबई | बिग बॅास सर्वाधिक लोकप्रिय शो आहे. या शो मधील प्रत्येक पर्वातील स्पर्धकांमध्ये होणारे वाद, मैत्री, प्रेम आणि दररोज होणाऱ्या स्पर्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात.
बिग बॅासच्या घरात राहणं वाटतं तेवढं सोप्प नाही. घरातील प्रत्येक दिवस स्पर्धकांसाठी अग्निपरीक्षाच असल्या सारखाच असतो. दररोजच्या होणाऱ्या स्पर्धा आणि वादाला कंटाळून काही स्पर्धक घर सोडून जाण्याचा विचार करतात. मात्र कोणताही स्पर्धक घर सोडून जाण्याची हिंमत करत नाही. कारण हा शो मध्येच सोडल्यास त्या स्पर्धकाला मोठी किंमत चुकवावी लागते .
बिग बॅासच्या घरात येण्याआधी स्पर्धक आणि वाहिणीमध्ये एक करार झालेला असतो. या करारानुसार हा शो मध्येच सोडल्यास सुमारे 2 कोटींचा दंड संबंधीत स्पर्धकाला द्यावा लागू शकतो.
दरम्यान, याआधीच्या प्रत्येक सीझनमध्ये कोणत्या ना कोणत्या स्पर्धकानं बिग बॅासचं घर सोडून जाण्याची धमकी दिल्याचं आपण पाहिलं आहे. पण बिग बॅासचा हा शो अर्धवट सोडणं कोणालाही परवडण्यासारखं नाही.
थोडक्यात बातम्या-
सचिन तेंडुलकरचा फोटो जाळणं हा राष्ट्रद्रोह- नारायण राणे
नवरदेवाच्या वागण्यानं स्टेजवर एकच गोंधळ; नवरीही झाली आऊट ऑफ कंट्रोल, पाहा व्हिडीओ
“भरणे मामा मंत्री झाले, मी मंत्री झालो… आम्ही कधी जॅकेट घातलं का?”, या नेत्याला अजितदादांचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; पाहा काय आहे प्रकरण…
अमित शहांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं- नारायण राणे