नागपूर | मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील बंगल्यावर साप निघाला. तो साप मुख्यमंत्र्यांना चावला असता तर त्यांना आज श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले.
नागपुरात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अधिवेशनाचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. त्यामुळे अजित पवारांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढवला.
विधानसभा अध्यक्षांनी स्वतः झोकून काम केलं. असंच काम सगळ्यांनी करायला हवं. तसंच विधानसभा अध्यक्ष जसे वाकून बघत होते, तसे इतरांनी झाकून ठेवण्याची गरज नव्हती, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या–
-मनसेला आणखी एक धक्का; महापौर ललित कोल्हेंचा भाजपमध्ये प्रवेश
-धक्कादायक!!! 99 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार
-मी वारी केली नाही, पण कधी अनादरही केला नाही- शरद पवार
-संतांपेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ नाही; भुजबळांचा भि़डेंवर निशाणा!
-गोपाळ शेट्टींचे काय चुकले?; सामनाच्या अग्रलेखात भाजप खासदाराची पाठराखण