बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेस जर स्वबळावर अडून राहिली तर…- जयंत पाटील

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपुर्वी स्वबळाचा नारा दिला होता. त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार आहे. सध्या राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. काँग्रेस जर स्वबळावर अडून राहिली तर राष्ट्रवादी व शिवसेना एकत्रित निवडणुकीला सामोरे जाईल, असं जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्रित सामोरे जातील. त्यातूनही काँग्रेस स्वबळावर अडली तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढतील, असं देखील जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवरून भाजपने टीका केली होती. ‘अजितदादा येणार म्हणून लोकांनी मोठी गर्दी केली. भाषणात त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. त्यांना गर्दी अपेक्षित नव्हती. सर्वांत जास्त फिजिकल डिस्टन्सिंग अजितदादाच पाळतात. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही’, असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ गावाने करून दाखवलं; 100 टक्के लसीकरण करणारं देशातील पहिलं गाव ठरलं

“जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका, पण…”

“एकमेकांवर चपला फेकतील की पुष्पहार अपर्ण करतील, हे तेच ठरवतील”

कोरोना संकटकाळात योगाच आशेचा किरण ठरला- नरेंद्र मोदी

जेमिनसनचा पंजा! भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More