महाराष्ट्र सांगली

हिंमत असेल तर निवडणुकीला उभं राहून दाखव, संजय काकांचं पडळकरांना खुलं आव्हान

सांगली | “हिंमत असेल तर निवडणुकीला उभं राहून दाखव”, असं खुल आव्हान सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना दिले आहे. आमच्यापासून काल बाजूला गेलेली लोकं आमच्यावर बेताल वक्तव्य करत आहेत, असंही पाटील म्हणाले.

मिरज येथे निवडणुकीसंदर्भात झालेल्या एका कार्यक्रमात संजयकाका आणि गोपीचंद पडळकर एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

जिल्ह्यातील नेत्यांनीच जिल्ह्यातील पालकमंत्री होऊ दिला नाही, असा आरोप करत पडळकर यांनी संजयकाकांना कोपरखळी मारली.

दरम्यान, संजयकाकांनी गेल्या काही काळात सिंचनासह अनेक प्रश्न सोडविण्यासाठी ताकद लावली आहे, असंही पडळकरांनी त्यावेळी सांगितलं. मात्र या कार्यक्रमात या दोघांमध्ये बरीच बाचाबाची झालेली पाहायला मिळाली.

महत्वाच्या बातम्या-

“वेळेला आणि वेळेच्या शेवटी आम्ही दोघे भावंडं कायम सोबत असतो”

साताऱ्यात उदयनराजेविरोंधात शिवसेना डरकाळी फोडणार!

-सुप्रिया सुळे अमित शहांवर भलत्याच संतापल्या!

आलिया भट्टची जुळी बहिण पाहिलीत का? पाहा व्हीडिओ

बारामतीची उमेदवारी सुप्रिया सुळे देणार एका सर्वसामान्य मुलीला पण त्या आधी…..

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या