मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) हे शिंदे सरकारवर नेहमीच टीका करत असतात. आता पुन्हा एकदा एकदा अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर(CM Eknath Shinde)जोरदार टीका केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकर करा अशी आम्ही अनेक दिवसांपासून विनंती करत आहोत. आता यावर मुख्यमंत्र्यांनी लवकर करु, लवकर करू असं म्हणणं बंद कारावं, असं म्हणत त्यांनी शिंदेंना टोला लगावला.
मुख्यमंत्री रूग्णालयात असताना रात्री 12-1 वाजेपर्यंत घोषणाबाजी केली जाते. मुख्यमंत्र्यांना माईक बंद करायचा कळत नाही का, असंही पवार म्हणाले. शिंदे उद्धव ठाकरेंसोबत(Uddhav Thackeray) असताना शिस्तीने वागायचे, आता वेगळ चित्र पहायला मिळतंय, असं वक्तव्यही पवारांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बोलताना पवार म्हणाले, लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांना अधिकार दिले नाहीत. दिल्ली वारी केल्याशिवाय तेथून ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय मंत्रीमंडळ विस्तार होत नसतो हे स्पष्ट आहे. मध्यंतरी असं ऐकायला मिळाले होते की, राष्ट्रपती-उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर मंत्रीमंडळ विस्तार होईल, पण आता असं बोललं जात आहे की सर्वोच्च न्यायलयाचा निकालासाठी थांबले आहेत, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय.
दरम्यान, अजित पवारांनी कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. सत्ता येते जाते, कोणी ताम्रपट घेऊन येत नाही. उद्या दर कोर्टाचा निकाल आला तर हे सरकारही जाऊ शकतं, त्यामुळे तयारीला लागा, असं अवाहनही त्यांनी कार्यकर्त्याना केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं!
“पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारतीयांचा गौरव होतो”
संजय राऊतांनंतर आता काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता अडचणीत
आयसीआयसीआय आणि पीएनबी बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका!
दीपक केसरकर यांचा मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ
Comments are closed.