बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बिघडलंय तर इंजिन आणि बदलले डबे’; मंत्रीमंडळाच्या विस्तारावर महाविकास आघाडीची टीका

मुंबई | केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना मोदी सरकारने आपल्या मंत्रिमंडळात संधी दिली आहे. यामध्ये 15 कॅबिनेट आणि 28 राज्य मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एकूण 4 नेत्यांना केंद्रात मंत्रीपद मिळालं आहे. त्यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्रीमंडळ विस्तारावर टीका केली आहे.

‘बिघडलंय तर इंजिन आणि बदलले डबे..! व्वा मोदीजी व्वा !’ , अशी बोचरी टीका काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. तर राजीनामा दिलेल्या मंत्र्यांची नावे आणि नव्याने मंत्रीपदी विराजमान होणाऱ्यांची नाव वाचून असं वाटतंय इथून पुढे आयारामांना पक्ष सदस्य होण्यापूर्वी मंत्रीपदाची शपथ दिली जाईल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

मोदी मंत्रीमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना स्थान देण्यात आलं आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रीपद देण्यात आल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर कोण कुणाला अंगावर घेतं हे तुम्ही बघालच, अशी टीका शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी राणे यांच्यावर केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये वाकयुद्ध पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नगरसेवक ते केंद्रीय मंत्री हा प्रवास मोठा आहे, सोपा नक्कीच नाही. हे येरागबाळ्याचं काम नाही. उरला प्रश्न शिवसेनेचा तर त्यांना आम्ही किंमत देत नाही. जे मिळालं त्यात आम्ही समाधानी असल्याचं म्हणत निलेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला होता.

थोडक्यात बातम्या-

एकनाथ खडसेंची प्रकृती बिघडली; आज होणारी पत्रकार परिषद रद्द

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी, वाचा एका क्लिकवर

पीयूष गोयल यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढलं, या मंत्र्याची रेल्वेमंत्रिपदी वर्णी

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा आभारी”

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर; वाचा कोणाला कोणतं मंत्रिपद?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More