बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुंपणच शेत खात असेल तर राज्यातील जनतेने कुठे न्याय मागायचा?- चित्रा वाघ

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. कुंपणच शेत खात असेल तर राज्यातील जनतेने कुठे न्याय मागायचा? असा सवाल चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला केला आहे.

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी जमा करायला लावले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राजीनाम्याची मागणी होत असताना अनिल देशमुख यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.  अनिल देशमुखांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या आरोपांवर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, ख्वाजा युनूस प्रकरणात 17 वर्षे निलंबित असलेल्या सचिन वाझे यांना शिवसेनेत कोणी आणलं, त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी नेणारी ती व्यक्ती कोण होती, असा प्रश्न मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील उपस्थित केला.

थोडक्यात बातम्या –

‘…त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे’; नारायण राणेंच्या आरोपाने खळबळ

‘केंद्राने या प्रकरणाचा तपास केल्यास राज्यात फटाक्याची माळ लागेल’; राज ठाकरे कडाडले

परमबीरसिंग यांचा धक्कादायक खुलासा; मेल आयडीबद्दल म्हणाले…

राज्यात सत्ताबदल होणार?; उदयनराजेंना ‘या’ शिवसेना नेत्यानं वापरलेल्या वाक्यानं चर्चांना उधाण

एका पोलीस अधिकाऱ्याला 100 कोटीचं लक्ष्य मग अख्ख्या राज्य सरकारसमोरील लक्ष्य किती असेल- पूनम महाजन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More