पुन्हा आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण?, जयंत पाटील म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi_) सरकार आल्यास मुख्यमंत्री (Cm) कोण असेल, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर देताना मोठं वक्तव्य केलं आहे. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’च्या कार्यक्रमात बोलत होते.

आत्ताच विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्यात. त्यात आमचे दोन उमेदवार निवडून आलेत. या निवडणुकीत पदवीधर आणि शिक्षकांनी मतदान केलं. म्हणजेच राज्यातील सुशिक्षित मतदार महाविकास आघाडीच्या पाठिशी आहे. त्यामुळे आम्ही एकत्र असलो तर भाजपचा पराभव नक्कीच असणार आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.

आगामी विधासभा निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त 60 जागा मिळतील. भाजपकडे मोदींच्या नावाशिवाय काहीच नाही. परंतु राज्यात जे काही सुरु आहे, त्याबद्दल जनतेच्या मनात चिड आहे. हा राग मतपेटीतून उतरणार असून महाविकास आघाडी सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, पवार साहेबांची आकलन शक्ती प्रचंड आहे.

राज्यातील कानाकोपऱ्याची माहिती त्यांना आहे. देशातील सर्व घटनांची बारकाईने ते नोंद ठेवतात. त्यांचा अनुभवाचा प्रचंड फायदा सर्वांना होतो. राजकारणापेक्षा काम करणाऱ्यावर त्यांचा भर जास्त आहे, असं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-