बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! हाॅकी संघाने सुवर्णपदक जिंकल्यास ‘हे’ सरकार प्रत्येक खेळाडुला देणार एवढे कोटी रूपये

नवी दिल्ली | सध्या जापानच्या टोकीयोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत भारतातील अनेक खेळाडु सहभागी झाले असून टोकीयो ऑलिम्पिकमध्ये स्पर्धक उल्लेखनिय कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभुमीवर खेळाडुंसाठी मोठ्या प्रमाणात बक्षीसांचा वर्षाव होत आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडुंना प्रोत्साहन मिळावं म्हणुन अनेक राज्यांकडुन विविध आर्थिक मदत जाहीर करण्यात येत आहे. पंजाब सरकारने आता याच पार्श्वभुमीवर हाॅकी खेळात भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकल्यास पंजाब राज्यातील प्रत्येक खेळाडुला कोट्यवधींचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. पंजाबचे क्रीडामंत्री राणा गुरमितसिंह सोढी यांनी याबाबत घोषणा केली आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या हाॅकी संघाची एकुणच आतापर्यंतची कामगिरी उत्तम आहे. तसेच येत्या काळात भारताची सुवर्ण पदकाकडे यशस्वी वाटचाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच ऑस्ट्रेलियासोबतचा एक सामना सो़डला तर इतर सर्व सामन्यात भारतीय हाॅकी संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

हाॅकी खेळात असलेल्या पंजाबच्या खेळाडुंना संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यास 2.25 कोटी रूपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे पंजाबच्या खेळाडुंना प्रोत्साहन मिळेल, असं पंजाब सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या –

रिलायन्स जियोने आणला सर्वात स्वस्त धमाकेदार प्लान; वाचा सविस्तर

“मारूतीच्या साक्षीने तुम्ही शब्द देऊन गेला पण दोन वर्ष बघितलं नाय अन् आता परत आलाय”

पूरग्रस्त भागात वीज बिल वसूलीबाबत उर्जामंत्र्यांचे ‘हे’ आदेश

पतीच्या बेडरुममध्ये दुसऱ्या महिलेला पत्नीने रंगेहाथ पकडलं अन् घडला अनपेक्षित प्रकार!

पुण्यासह ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी; कोकणातही पाऊस परतणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More