बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर…- चंद्रकांत पाटील

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार हल्ला बोल केला आहे. यादरम्यान मराठा आरक्षणाबाबत न्यायलयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडायला राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच मराठा आरक्षण न मिळाल्यास होणाऱ्या परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिला आहे.

मराठा आरक्षणाचा विषय जेव्हा मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. तेव्हा तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत उच्च न्यायालयाला कन्व्हिन्स केलं होतं. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणही मिळालं आणि मागासवर्ग आयोगाला मंजुरीही मिळाली. मात्र हीच गोष्ट सर्वोच्च न्यायालयाला कन्व्हिन्स करण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

तामिळनाडूने आरक्षणाची मर्यादा ओलांडली, पण त्यांच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही. मराठा आरक्षणावरच स्थिगिती का आहे?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

इतर राज्याने आपल्या ताकदीवर जसं आरक्षण दिलं आणि टिकवलं. तसंच महाराष्ट्र सरकारनेही आपल्या ताकदीवर आरक्षण टिकवलं पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

रस्त्यात छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला तिने बेशुद्ध होईपर्यंत धू-धू धुतलं!

…हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचं लक्षण नाही, हा उठावडेपणा आहे- एकनाथ खडसे

तब्बल 500 दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘या’ देशाचा दौरा

रूसलेल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी कायपण…; तरूणाने केला ‘हा’ कारनामा

शाहीनबाग आंदोलनाला तापसी, अनुरागने पैसा पुरवला- कंगना रनौत

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More