औरंगाबाद | जे आपल्या हातात नाही त्यासाठी आंदोलन करुन उपयोग होणार नाही, मंत्र्याच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
सरकारने शिदेंच्या कुटुंबियांना 10 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, 10 लाख काय 10 कोटी देऊन काकासाहेब शिंदेच्या कुटुंबाची भरपाई करता येणार नाही.
दरम्यान, काही पेड लोक आंदोलानात घुसली आहेत, त्यांना हे आंदोलन बदनाम करायचे आहे. निवडणूक काळात हे प्रकार वाढणार आहेत. पण आंदोलकांनी या पेड लोकांना खड्यासारखे बाजूला करावे, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!
-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस
-मराठा मोर्चानं आणखी एक मागणी वाढवली, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!’
-मराठा मोर्चेकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक!
-मराठा मोर्चेकऱ्याच्या मृत्यूनंतर आंदोलन चिघळलं; मोर्चेकरी आक्रमक