बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जनामनाची लाज असती तर राजीनामा दिला असता…”

मुंबई | शिंदेगटाच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महत्वाची खाती असलेले मंत्री महाराष्ट्राचे प्रश्न सोडून ‘रॅडिसन ब्लू’ (Radisson Blu) मध्ये जाऊन बसले आहेेेेेेेेेेेत. जनमनाची लाज असती तर मंत्रीपदाचे राजीनामे दिले असता. सामनाच्या अग्रलेखातून आजही बंडखोर आमदारांवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या हितासाठी भाजपबरोबर जात आहोत असं म्हणारे तुम्ही महाराष्ट्रात हे तुटी-फुटीचे संकट भाजपमुळे आलं आहे. याबद्दल तुमचे दलबदलू प्रवक्ते गप का बसले आहेत?, असा सवाल केला. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची योजना दिल्लीतील भाजप(BJP) नेते करत आहेत. गृहमंत्री अमित शहांनी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधल्यावर सगळ्या आमदारांना सुरक्षा देण्यात आली. जो भाजप सतत महाराष्ट्रावर हल्ले करत आहे. त्याच भाजप नेत्यांकडून हे लोक मार्गदर्शन घेऊन उत्साहाची उर्जा निर्माण करत आहेत.

चंद्रकांतदादा पाटील यांना विचारलं असता ते म्हणतात हा त्यांचा अंतर्गत प्रश्न, भाजपचा त्यांच्याशी काही संबध नाही. दुसरीकडे यांचेच मंत्री दानवे म्हणतात अजून दोन-तीन दिवस विरोधी बाकावर बसू दोन-तीन दिवसात भाजप सरकार येईल. यातील नेमक खरं काय?, असा सवाल सामनातून उपस्थित केला. महाराष्ट्रात (Maharashtra) सरकार पाडण्याचे प्रयत्न कोण करत आहे हे उघड झालं आहे.

छत्रपती संभाजीराजे, शिवाजीमहाराज यांच्या प्रेमाचे-स्वाभिमानाचे दाखले आपण देतो ते स्वराज्य प्रेम कोठे गेले? भारतीय जनता पक्षाशी पाठ लावून बसण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आपला महाराष्ट्र बाणा तपासून पहावा, असा टोला सामनातून बंडखोर नेत्यांना लगावला.

थोडक्यात बातम्या

राज्यात आज काहीतरी होण्याची शक्यता, भाजपने आमदारांना पाठवला ‘हा’ निरोप

सकाळी स्पा, मसाज, जीम; तर रात्री… बंडखोर आमदारांचा दिनक्रम ऐकून चकीत व्हाल!

काळजी घ्या! दारू नाही तर ‘या’ पदार्थांमुळेही होऊ शकतं लिव्हर खराब

शिवसैनिकांचा संजय राठोडांना जोर का झटका, पूजा चव्हाण प्रकरणात करणार ‘हा’ धक्कादायक खुलासा

मुलाशी मैत्री केली म्हणजे मुलीची शारीरिक संबंधांना परवानगी समजू नये- उच्च न्यायालय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More