बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर…’; बंडखोर आमदाराचं वक्तव्य

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांच्या कार्यालय व घरांवर तोडफोड होत आहे. यामुळे  जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर तुम्ही काय करणार आहात. तुम्ही ती परिस्थिती आणत आहात, असा हल्लाबोल शिंदे गटात सामील झालेले दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडीवर केलाय.

2019 वेळी भाजप आणि सेनेत वाद झाल्यावर उद्धव ठाकरे बाहेर पडले. त्यावेळी भाजप रस्त्यावर उतरली का तुम्हालाही निर्णय स्विकारावा लागेल. मग भाजपवर आरोप करायचे नाही, असा इशारा त्यांनी दिला.

एकीकडे नेत्यांना एकनाथ शिंदेची समजूत काढायला पाठवली आणि दुसरीकडे दुसरा गटनेता निवडला. हे चुकीचं आहे. एकनाथ शिंदे यांचं ऐकून घेऊन , मगच कारवाई करायची होती पण, असं झालं नाही. आमदारांना एकीकडे बोलवायचं आणि दुसरीकडे कारवाईचा इशारा दिला हे योग्य नाही, असं ते म्हणाले.

विधानसभा उपाध्यक्षांनी आमच्या गटाला मान्यता दिली तर लगेच मुंबईत येऊ. आम्ही मनापासून प्रेम प्रेम करणारे आहोत. जो लढा कोकणात उभा केला, तोच लढा मुंबई उभा करू शकतो, असा इशारा त्यांनी दिलाय.

थोडक्यात बातम्या

शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या घर-कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न; केंद्राने घेतला हा निर्णय

सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सीतलवाड यांना अटक, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी अमित शहा मैदानात?, महत्त्वाची माहिती समोर

‘माकडं जशी…’; असदुद्दीन ओवैसींनी आमदारांना सुनावलं

राज्यपाल इज बॅक, भगतसिंह कोश्यारींना रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More