बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर शेतकऱ्यांना 4000 कोटी मिळाले असते”

नांदेड | यंदाच्या वर्षी आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं. पुन्हा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातीशी आलेलं पीक वाया गेलं. त्यामुळे राज्यातील बळीराजा कमालीचा त्रस्त आहे. आता शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत. ते नांदेड जिल्ह्यातील देगलुर-बिलोली पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी पीकविम्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी त्यांच्या काळात किती रक्कम कोणत्या जिल्ह्याला देण्यात आली आहे याचाही उल्लेख केला आहे. अजूनही शेतकऱ्यांना पीक विम्याची पुरेशी रक्कम देण्यात आली नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्या बैठकीचा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दाखला दिला आहे. भागवत कराड वित्तराज्यमंत्री झाल्यावर आम्ही त्यांना विचारलं की, पीक विमा आपल्या काळात मिळत होता तो आता का मिळत नाही? त्यावर पीक विमा कंपन्याची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेेळेस पीक विमा कंपन्यांनी धक्कादायक वास्तव समोर आणलं आहे.

राज्य सरकारच्या हिश्याचे 1700 कोटी राज्य सरकारने भरायचे होते. त्यातला एक पैसाही त्यांनी भरला नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तो पैसा जर राज्य सरकारने भरला असता तर आम्ही 4000 कोटी रूपये आम्ही शेतकऱ्यांना दिले असते. परंतु, पैसेच भरले नाहीत तर विम्याचे पैसे कसे येतील? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. तसेच राज्य सरकारकडे चैनीला पैसा आहे मात्र, शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे राज्य सरकार भरत नाही म्हणून शेतकरी संकटात आहे, असा जोेरदार टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

लेकाची कामगिरी पाहून बाबर आझमच्या वडिलांना अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ

‘पाकिस्तानविरुद्ध आपण कधी ना कधी हरणार’, धोनीची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

समीर वानखेडेंवरील आरोपांच्या चौकशीला सुरूवात; वानखेडे दिल्लीला जाण्याची शक्यता

“यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की, केंद्र सरकारचा हात आहे”

एलपीजी गॅस वापरताय तर तुम्हालाही मिळणार 50 लाखांचा विमा, कसं ते वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More