बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“त्यांची आडनावं पवार, थोरात आणि ठाकरे असती तर असं केलं असतं का?”

मुंबई | राज्यातील पदभरतीमध्ये चालू असणारा गोंधळ काही केल्या कमी होत नाही. तोंडावर आलेली आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर आता राज्याचं राजकारण पेटलेलं दिसत आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्यात शनिवारी परीक्षा होणार होत्या. त्यामुळे सर्वजण परीक्षेची तयारी करत होते. मात्र ऐनवेळी सरकारने ही परीक्षा रद्द कली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड होऊन परत घरी जावं लागलं. जर विद्यार्थ्यांची आडनावं पवार, थोरात आणि ठाकरे असली असती तर असं केलं असतं का?, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांची पोरं जर परीक्षेला असती तर असं केलं असतं का? असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. गरीब मुलांनी कुठून पैसे आणावेत. यांच्याकडे काय वसूलीचा पैसा आहे का? अशी खोचक टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, परीक्षा रद्द केल्यानं विद्यार्थ्यांना जो जो काही भूर्दंड बसलाय या सर्वांची जबाबदारी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलीच पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…म्हणून परीक्षा रद्द करण्यात आल्या’; देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप

अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपासून उघडणार चित्रपटगृहे

“ठाकरे सरकार टक्केवारीच्या फुगड्या खेळतंय का?”

आम्हाला पुन्हा संधी मिळणार, कधी ते सत्तेत तर… – देवेंद्र फडणवीस

UPSC Result | मराठवाड्याच्या विनायक महामुनीने देशात मिळवला 95 वा क्रमांक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More