बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…’;

मुंबई | आज हिवाळी अधिवेशनाचा (Winter session) तिसरा दिवस आहे. आज अधिवेशन सुरु होण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अधिवेशाच्या कालावधीवर वक्तव्य केलं आहे.

आज राज्याच्या समोर 200 प्रश्न आहेत. आरोग्य सेवेचा भ्रष्टाचार आहे. कामगार, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. आरोग्य सेवेचा भ्रष्टाचार आहे. यावर चर्चा करण्याची एक जागा आहे, ती म्हणजे विधानभवन. त्यामुळे चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी आमची आग्रही मागणी आम्ही आज करणार आहे, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर अधिवेशन लवकर संपवतील, असा खोचक टोलाही यावेळी मुनगंटीवार यांनी लगावला आहे. त्यामुळे आज अधिवेशनाचा कालावधी वाढणार का? हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राज्यातील विधान भवनात हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरुवात झाली आहे. यंदा मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. अधिवेशनाचा कालावधीही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनाच्या कमी कालावधीमुळे सरकारवर हल्लाबोल केला जात आहे.

 थोडक्यात बातम्या – 

‘मांजर आडवं गेले तरी…’; नितेश राणेंच्या म्याव म्याववर शिवसेनेचं टीकास्त्र

सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव

धक्कादायक! Omicronपासून वाचण्यासाठी आता एका व्यक्तीला मिळणार ‘इतके’ डोस

मस्तच ना! आंतराळातील हेअर कटिंग, पाहा व्हायरल व्हिडीओ

Omicronच्या धास्तीनं राज्यात नवे निर्बंध, आजपासून नवे नियम लागू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More