देशातील अशिक्षित नागरिक देशावरील ओझं आहेत – अमित शहा

नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीत 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या धर्तीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद वाहिनीकडून मुलाखत घेण्यात आली आहे. अमित शहा हे नरेंद्र मोदींचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. अमित शहांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींचं कौतूक केलं आहे.

देशात जर अशिक्षित व्यक्ती असतील तर त्या देशावरील ओझं आहेत. अशिक्षित लोकांना ना संविधानाने दिलेल्या हक्कांची माहिती असते ना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची माहिती असते. यामुळेच त्या अशिक्षित व्यक्ती चांगली नागरिक कशी होईल? असा अमित शहांनी संसद वाहिनीस दिलेल्या मुलाखतीमध्ये उपस्थित केला आहे.

मोदी गुजरातचे पंतप्रधान होते, तेव्हा शाळांमध्ये मुलं जाण्याचं प्रमाण जास्त नव्हतं. मोदींनी त्यावेळी उत्सवाप्रमाणे मुलांना शाळेत टाकण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी त्यांनी पालकांची एक समिती नेमली होती. तसेच शिक्षकांना त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या. त्यामुळे शाळांच्या बाहेर असलेल्या मुलांचे प्रमाण 36 टक्क्यांवरून 1 टक्यावर आलं, असं शहा म्हणाले आहेत.

दरम्यान, मोदींचे काम मी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. त्यांच्यावर हुकूमशाहीचे लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. तसेच मोदी कोणत्याही बैठकीमध्ये अगदी मोजकंच बोलतात. ते कधीच निर्णय लादत नाहीत. ते सर्वांचे ऐकूणच निर्णय घेतात, असं शाहंनी संसद वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘या’ तीन अर्थशास्त्रज्ञांना जाहीर!

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

लखीमपूर प्रकरणात आशिष मिश्राला न्यायालयाने दिली ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

“देवेंद्र फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही; रामराज्याच्या नावाखाली तालिबानी राजवट सुरू आहे”

“आजचा ‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी, हा आघाडी सरकारचा बंद नाही तर…”

Amit ShahBjplatest marathi newsMaharashtraMarathi NewsNarendra Modiअध्यक्ष अमित शहानरेंद्र मोदीभाजपमराठी बातम्यासरकार