बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गुन्हेगार मला शुभेच्छा देतायत त्यात माझा काय दोष?, चुकीचे होर्डिंग असतील तर भाजपने काढावेत”

पुणे | महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या घडीचे मोठे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस दोन दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावले आहेत. मात्र या फ्लेक्सवरून पुण्यनगरीत रस्सीखेच चालू आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार संतापले आहेत.

अनधिकृत होर्डिंग लावायला मी सांगितले का?, गुन्हेगार मला शुभेच्छा देतायत त्यात माझा काय दोष?, चुकीचे होर्डिंग असतील तर भाजपने ते काढावेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

शहरात भाजपची सत्ता आहे त्यांनी ते काढावे पोलिसांनी त्यावर कारवाई करावी, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. शहरात करण्यात आलेली फ्लेक्सबाजी पुणेकरांच्या चर्चेचा विषय झाली आहे. या फ्लेक्सबाजीवर आता दोन्ही बाजूने टीका देखील केली जात आहे.

दरम्यान, ‘शिल्पकार नव्या पुण्याचे नेतृत्व नव्या महाराष्ट्राचे’, ‘विकासपुरुष’, ‘अद्वितीय कर्तृत्व आक्रमक नेतृत्व’ अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तर तर दुसरीकडे ‘कारभारी लय भारी’, ‘बोले तैसा चाले’, ‘कृतीशील विचारांचा गतीशील नेता,’ ‘पुण्यनगरीचा विश्वास दादा म्हणजेच विकास’ अशा शब्दांमध्ये अजित पवारांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

चिंता वाढली! नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात लक्षणीय वाढ

‘या’ वेळेमध्ये सर्वाधिक भारतीय पाहतात पॉर्न, ‘हे’ राज्य आहे पहिल्या स्थानावर!

इंधनांवरील कर कमी होणार का?; केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

“भारताला पाकिस्तान बनवण्यासाठी 1930 पासून योजनाबद्ध पद्धतीने मुस्लिमांची संख्या वाढवण्यात आली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More