बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मला खोटं बोलता येत नाही, जे करायचंय ते केल्याशिवाय राहणार नाही- उद्धव ठाकरे

सांगली | गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यात मोठं नुकसान झालं. त्यामुळं सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. आज मुख्यमंत्री सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. पावासाच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झालेल्या भिलवडी गावात आज मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिलं आहे.

संकटं आली की आपल्याकडे पॅकेज जाहीर केली जातात. ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. संकट आलं की पॅकेजची घोषणा होते, मग हे पॅकेज जातं तरी कुठं, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. मला अशी थोतांड येत नाहीत. मला खोटं बोलता येत नाही. जे करायचं ते प्रामाणिकपणे केलं जाईल आणि ते केल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांची एक छोटी सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

कोरोना संकट आणि पुराचं संकट या दोन्ही संकटाचा सामना आपण करत आहोत. त्यामुळे गर्दी करू नका, असं आवाहन देखील त्यांनी केलं होतं. पावसामुळे झालेल्या नुकसानीची मला कल्पना आहे. तुमच्या वेदना आणि व्यथा आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे काळजी करू नका. सरकार तुमच्यासोबत आहे. आमच्याकडून जे काही करता येईल ते ते आम्ही करू, असं आश्वासन त्यांनी सांगलीकरांना दिलं.

दरम्यान, सांगलीत अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यानंतर प्रशासानाने 4 लाख कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं. त्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही. मुख्यमंत्र्यांसोबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि खासदार धैर्यशिल माने देखील उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

कुणाला एवढी खूमखूमी आली असेल तर समोर या, स्वत:च्या पायावर याल पण…- संजय राऊत

भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी; महिला हाॅकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

विरोधकांच्या गोंधळामुळे केवळ 18 तास झालं संसदेचं कामकाज; इतक्या कोटींचं नुकसान

‘ही घ्या शिवसेनेच्या बाटग्यांची यादी’; राऊतांच्या अग्रलेखाला नितेश राणेंचं प्रत्युत्तर

‘अनेक संकटे आली पण उद्धव ठाकरेंनी हिंमत दाखवली’; पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More