बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लखीमपूरसारखी कोणाकडे जीप असेल तर, त्यांनी बाहेर काढून दाखवावी”

मुंबई | महाविकास आघाडीतर्फे लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या बंदच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कलगीतूरा रंगला आहे. महाविकास आघाडी ढोंगीपणा करत असल्याची टीका भाजपनं केली होती. तर लखीमपूर घटनेवर राज्यातील भाजप नेते बोलत नसल्याची टीका महाविकास आघाडीनं केली आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला चांगलंच फैलावर घेतलं आहे.

महाराष्ट्र बंदला विरोध करणारे मुर्ख आहेत. लखीमपूरमध्ये भाजपच्या मंत्र्यांच्या पुत्राच्या गाडीनं शेतकऱ्यांना चिरडलं. महाराष्ट्र बंदला विरोध करणाऱ्यांपैकी कोणाकडं तशी एखादी जीप असेल, तर त्यांनी ती बाहेर काढून दाखवावी, असं संजय राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्र बंदला सुरूवात झाल्यापासूनच महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे.

ठाकरे सरकारला जर शेतकऱ्यांचा इतकाच कळवळा असता तर त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असती, अशी टीका महाविकास आघाडीवर भाजपनं केली आहे. लखीमपूर घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध असल्याचं वक्तव्य सुद्धा यावेळी संजय राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, लखीमपूर येथील घटनेत आरोपी असणाऱ्या केंद्रीय मंत्री पुत्राला अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री हे अद्यापही आपल्या पदावर कायम असल्यानं त्यांच्या राजिनाम्यासाठी मोदी सरकारवर दबाव वाढत चालला आहे. महाविकास आघाडीनं सुद्धा लखीमपूर घटनेतील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या  

“इतक्या मतांनी निवडून द्या की, मी म्हणणाऱ्यांची बोबडी वळायला पाहिजे”

“आघाडी सरकारचा पोपट झाला, तिन्ही पक्षांनी उरली सुरली इज्जत मातीत मिळवली”

”नेतेगिरी म्हणजे लुटणं नाही, फॉर्च्युनरने चिरडण्यासाठी मी राजकारणात आलो नाही”

“त्याचं आडनाव ‘खान’ असल्यानं त्याला त्रास दिला जातोय”

“अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More