बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘प्रस्ताव आला तर भाजप विचार करेल’; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

मुंबई | आगामी काळात विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता राज्यात भेटीगाठीचं सत्र सुरू झाल्याचं दिसतंय. विधानपरिषदेच्या निवडणुका (Legislative Council elections) या बिनविरोध निवडूण आणण्याचे प्रयत्न सर्वच पक्ष करत असतात. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्या यासाठी हालचाली वाढल्याचं चित्र आहे. अशातच विधानपरिषदेच्या निवडणुकांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे.

निवडणूक बिनविरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप भाजपकडे आलेला नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडीकडून प्रस्ताव आल्यास देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, राजीव सातव आणि शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक ही बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजप करेल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. निवडणुकांवर जाऊन वेळ आणि पैसा खर्च व्हावा, अशी भाजपची वृत्ती नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

खुल्लम खुल्ला प्यार! प्रसिद्ध गायिकेचा किसिंगचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

लय जबरी पाऊस होणार!, महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

शाहरुख-गौरीचं टेन्शन मिटलं, कजरारे गाण्यावर दोघंही तुफान नाचले!, पाहा व्हिडीओ

चंद्रपूरच्या तरुणीनं अनेकांना फोडलाय घाम, पहिल्यांदा द्यायची नयनसूख अन् त्यानंतर…

पुण्यात मोठी खळबळ, तृतीयपंथीयासोबत घडला अत्यंत निर्घृण प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More