बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राज्यात तिसरी लाट आलीच तर ती Omicronची असेल’; आरोग्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई | राज्यात ओमिक्राॅनचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ओमिक्राॅनच्या धास्तीनं अनेक ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा (Corona) नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं (Omicron) चांगलचा कहर केला आहे. जगभरातील ओमिक्राॅनच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनानं महत्त्वाची पाऊल उचलायला सुरुवात केली आहे.

ओमिक्राॅन आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन नियमावली (Corona Guideline) जाहीर केली. यातच ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे.

तिसरी लाट जर येणार असेल तर ती ओमिक्राॅनचीच असेल. असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. आताच जर आपण राज्यात खबरदारी घेतली नाही, तर रुग्णवाढीचा दर आणखी वाढण्याची भीती असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकांनी गर्दी टाळावी, निर्बंध पाळावेत आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी नागरिकांना केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘दोन बायका फजिती ऐका! ‘या’ पठ्ठ्यानं दोन्ही बायकांना निवडणुकीत आणलं निवडूण

आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा, घबाड पाहून अधिकारीही चक्रावले

‘या’ भाजप नेत्याने नरेंद्र मोदींची तुलना केली छत्रपती शिवाजी महाराजांशी, म्हणतात…

‘या लोकांनी भिकारी करून टाकलं’ म्हणत भाजप मंत्र्याने मंत्रीमंडळ बैठकीतच दिला राजीनामा!

नवाब मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर, फोटो शेअर करत म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More