Top News देश

‘हिंमत असेल तर भाजपने राष्ट्रगीत बदलून दाखवावं’; ममता बॅनर्जींचं भाजपला आव्हान

नवी दिल्ली | राष्ट्रगीत बदलण्यासंदर्भात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक पत्र लिहिलं होतं. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपवर टीका करत भाजपला आव्हान दिलं आहे.

हिंमत असेल तर भाजपने राष्ट्रगीत बदलून दाखवावं त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल. ते आपल्या देशाचा इतिहास बदलू इच्छित आहेत, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. एका सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या.

देशाच्या गृहमंत्र्यांना काही काम नाही. उठसूठ पश्चिम बंगालमध्ये येतात. कधी कोण नेता तर कधी मंत्री येतात. आता चड्डा, नड्डा, फाड्डा, गड्डा आलेत. त्यांना राज्यात जनतेचं कुठलंही समर्थन नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नाटकं करायला लावली असल्याचंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

दरम्यान, माध्यमाद्वारे भाजप नागरिकांना सभेपर्यंत आणू शकली नाही. यासाठीच हल्ल्याचा डाव रचला होता का? त्यांनी व्हिडीओ कसे काय तयार केले?, असे सवाल बॅनर्जी यांनी केले.

थोडक्यात बातम्या-

….म्हणून मी हाडाचा शेतकरी आहे बनावट नाही- रावसाहेब दानवे

“भाजपने मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर समाजाची दिशाभूल करणे थांबवावं”

“भाजपचा झेंडा गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेण्यात चंद्रकांत पाटील यांचा सिंहाचा वाटा”

“चांगल्या कामात केंद्र सरकारचं मांजर का आडवं जातं?

…तर महाराष्ट्रालाही तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल- संजय राऊत

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या