Top News देश

“काँग्रेसमध्ये घुसमट होत असेल तर सचिन पायलट यांनी भाजपत यावं”

Photo Credit- Facebook/Sachin Pilot

जयपूर | सचिन पायलट यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी भाजपत यावं आणि मोकळा श्वास घ्यावा, अशी खुली ऑफर भाजपचे राज्यसभेचे खासदार किरोडीलाल मीणा यांनी काँग्रेस नेते सचिन पायलट यांना दिली आहे.

सचिन पायलट यांनी संयम राखला पाहिजे. त्यांनी संयम राखला तर पायलट यांना त्यांच्या हक्काच्या सर्व गोष्टी मिळतील, असं किरोडीलाल मीणा म्हणाले आहेत. काँग्रेसनं पायलट यांना लाईनमध्ये उभं केलं आहे. ते एक ऊर्जावान नेते आहेत. काँग्रेसमध्ये एकमेकांची खेचाखेची अधिक आहे. काँग्रेसची ही लढाई राजस्थानसाठीही घातक आहे, अशी टीका किरोडीलाल मीणा यांनी केलीये.

राज्याचा विकासचं होत नसल्याचं किरोडीलाल ही मीणा यांनी म्हटलं आहे. किरोडीलाल मीणा दौसा येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

मीणा यांनी बोलताना राजस्थानचे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरही भाष्य केलं आहे. वसुंधरा राजे या जनाधार असलेल्या नेत्या आहेत. त्यांना बाजूला करण्याचा कोणताही प्रश्नच येतच नाही. ना त्या पक्षातून बाहेर जाण्याचा विचार करत असल्याचं वृत माध्यमांमध्ये येत आहे. मात्र ते दुर्देवी असल्याचंही किरोडीलाल माणी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

फास्ट-टॅगवरून मनसे नेत्या रूपाली ठोंबरेंचा टोल नाक्यावर राडा, व्हिडीओ व्हायरल!

…म्हणून महाराष्ट्रात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं- आशिष शेलार

शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाणार असाल तर सावधान!

एकाच गावातील तरुण-तरुणीच्या आत्महत्येनं खळबळ; पाहा काय आहे प्रकरण

“काही झालं तरी राम मंदिरासाठी देणगी देणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या