बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अमरावतीची जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही, खासदारकीचा राजीनामा द्यावा”

पुणे | अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला असून त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र न्यायालयानं अवैध ठरवलं आहे. तसेच नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन त्यांच्यावर निशाणा साधला. रुपाली चाकणकर म्हणाल्या, अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पण नवनीत राणा यांनी खोटं जातीचं प्रमाणपत्र सादर करून खासदारकी जिंकली. आज उच्च न्यायालयानं यावर जातीचं प्रमाणपत्र खोटं असल्याचा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना खरतर रिल लाईफ आणि रिअल लाईफमधील फरक माहित नाही.

अभिनय क्षेत्रात तुम्हाला एखादा सीन रिटेक करता येईल. पण अमरावतीची जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही. कारण आपण अमरावतीच्या लाखो मतदारांचा अपमान केला आहे. तसेच राज्यघटनेचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर आपण आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं, असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं.

दरम्यान, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने जात प्रमाण रद्द केल्यावर अमरावती शहरातील राजकमल चौकात शिवसेनेच्यावतीने जल्लोष करण्यात आला.

 

थोडक्यात बातम्या – 

व्हायरल व्हिडीओमुळं प्रसिद्ध झालेल्या ‘बाबा का ढाबा’मध्ये पुन्हा शुकशुकाट?, रेस्टॉरंट बंद करण्याची आली वेळ

मोदी-ठाकरेची ‘ती’ अर्धा तासाची भेट; महाराष्ट्राच्या राजकारणाची कुस बदलणार?

मुळशी तालुक्याची रग दाखवा, आपण कंपनीत घुसून…; मुळशीतील घटनेवर प्रविण तरडे संतापले

जात प्रमाणपत्र रद्द झाल्यावर नवनीत राणा यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या…

कौतुकास्पद! गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावली सनी लियोनी, केलं अन्नाचं वाटप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More