बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठी भाषेवर इतकं प्रेम आहे तर सरकारनेच दुकानांच्या सर्व पाट्या बदला”

मुंबई | राज्य सरकारनं बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहे. राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या झळकतील, असा निर्णय राज्य सरकानं घेतला आहे. या निर्णयाला काही ठिकाणी पाठिंबा दर्शवला जात आहे. तर काही ठिकाणहून याला विरोधही दर्शवला जात आहे.

राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे या निर्णयामुळे राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत. या निर्णयावर सगळीकडून प्रतिक्रिया उमटत असतानाच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.

मराठी भाषेवर इतकं प्रेम असेल तर मग सरकारने आपल्या तिजोरीतील पैशांनी जितकी दुकाने आहेत त्या सर्वांच्या पाट्या तुम्ही बदला. कारण कोरोना काळात लोकांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. यातच भविष्यात काय होईल हे माहित नाही, लाॅकडाऊन पडेल की नाही?, दुकाने उघडतील का नाही. या परिस्थितीत सरकार जर म्हणत असेल दुकांनांच्या पाट्या बदला तर ते शक्य नाही,असं खासदार इम्तियाज जलील म्हटलं आहे.

दरम्यान, बुधवारी मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पडसाद आता राज्यभरात पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज नसते’; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक टोला

राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांना आर्थिक फटका

…म्हणून पार्टीवर 10 हजार रुपये खर्च करुन करतायेत कोरोना पॉझिटिव्ह लोकांसोबत डिनर

“कुणी पाठीशी उभं नाही राहिलं तरी मी एकटा लढेन”

पालकांनो सावधान! लहान मुलांना कोरोना होण्याची संख्या ‘इतक्या’ पटीने वाढली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More