बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हे सरकार अहंकारी असेल तर सत्तेतून काढावे लागेल’; राकेश टिकैतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सात महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकारने यावर काही तोडगा काढलेला नाही. सुरुवातीला अतिशय शांतपणे चाललेलं शेतकरी आंदोलन आता हळूहळू हिंस्त्र रुप घेऊ लागलं आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या मनात नवीन कृषी कायद्यांविरोधात संताप वाढताना दिसत आहे.

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत हे कृषी कायदे सरकारने मागे घ्यावेत, या आपल्या मागणीवर अडून आहेत. ते सतत केंद्र सरकारसमोर शेतकऱ्यांच्या मागण्या मांडत आहेत. राकेश टिकैत यांनी आता केंद्र सरकारवर निशाणा साधत ही विधेयकं नक्की परत जातील, असं ठणकावून सांगितलं आहे.

राकेश टिकैत ट्वीट करत म्हणाले की, शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, रावणाच्या लंकेत एका वानरानेच आग लावली होती. हे विधेयकही परत जाईल, एमएसपी कायदा देखील होईल, परंतु त्यासाठी वेळ लागेल. हे सरकार अहंकारी असेल तर सत्तेतून यांना काढावे लागेल.

दरम्यान, केंद्र सरकारने नव्यानं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पहायला मिळत आहेत. जोपर्यंत केंद्र सरकार हे कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचं आंदोलनातील शेतकऱ्यांचं म्हणनं आहे. नव्या कृषी विधेयकांमुळे देशातील वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. यामुळे मोदी सरकार या कृषी कायद्यांबद्दल काय तोडगा काढणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“पटोलेंनी स्वबळाची घोषणा केल्यानं राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कापरे भरले आहे”

…..म्हणून केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटर हँडलची ‘ब्लू टिक’ हटवली

“योग्य माहिती अभावी नाना पटोलेंनी आरोप केले; सुरक्षा नको असेल तर तसं सांगावं”

शिवसेना नेते संजय राऊत रॉकस्टार- उर्मिला मातोंडकर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर नाना पटोलेंनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More