बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचे उपचार घेताना ‘हे’ औषध घेतलं तर झपाट्याने पसरेल कोरोना; एम्स संचालकांचा इशारा

नवी दिल्ली | कोरोना महामारीने देशात थैमान घातलं आहे. कोरोनाने आधीच थैमान घातलं असताना त्यात रूग्णांना बेड मिळताना दिसत नाहीत. तर कुठे ऑक्सिजनचा तुटवडा आणि औषध टंचाईमुळे अनेेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यावर घरीच राहुन डॉक्टरांच्या सल्ल्याने लोक औषधे घेतात. अशावेळी लोक लवकरात लवकर बरे होण्यासाठी स्टेरॉईड्सचा ओव्हर डोस घेत असल्याचं समोर आलं आहे. मात्र यामुळे आपल्याला फटका बसण्याची शक्यता आहे. याबाबत एम्सचे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया माहिती दिली आहे.

लोकांना वाटतं की रेमडेसिविर आणि इतर औषधं स्टेरॉईड्सप्रमाणे मदत करतील. पण यांची गरज नेहमीच असतेच असं नाही. याबाबत लोकांना कल्पना नाही म्हणून फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधं घ्यायला पाहिजेत, असं रणदिप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या २ दोन स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये व्हायरसचं संक्रमण झाल्यानं तापची समस्या उद्भवते. हळूहळू व्हायरस फुफ्फुसांपर्यंत पोहोचू लागतो. त्यानंर ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ लागते. अशावेळी एंटी व्हायरल ड्रग्स दिले जातात. त्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये कोरोना रूग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते शरीरात इंफ्लेमेटरी रिएक्शन वाढू लागते. यावेळी रुग्णाच्या शरीराला स्टेरॉईड्सची गरज असल्याचं, असं रणदिप गुलेरिया म्हणाले.

दरम्यान, जर आपण सुरूवातीच जर कोराना ग्रस्ताला स्टेरॉईड्स दिल्यावर व्हायरसचे रेप्लिकेशन वाढू शकते. म्हणजेच अशावेळी शरीरातील व्हायरस वेगानं आपली संख्या वाढवत असल्याचं गुलेरिया यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

…म्हणून कंगणा राणावतला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ

आनंदाची बातमी! भारतातील ‘ही’ लस कोरोनावर प्रभावी; ICMR च्या संशोधनातून समोर आले निष्कर्ष

पत्नी आणि मुलीसाठी सुट्टी मिळाली नाही; पोलिस अधिकाऱ्याचा बेधडक निर्णय

आईला कोरोना, बेड मिळेना, मात्र मुलगा आणि मुलीनं हार मानली नाही; एका धैर्याची कहाणी!

“हिंसा घडवणारे बंगालचे आहेत की बंगालबाहेरचे?, टाळी एका हाताने वाजत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More