नवी दिल्ली | देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळं तात्काळ कठोर उपाययोजना करा, अन्यथा पायाभूत सुविधा उद्ध्वस्त होतील, असा इशारा केंद्राने राज्यांना दिला आहे.
सहा महिन्यांच्या तुलनेत मार्चमध्ये कोरोना 38 टक्क्याने वाढला आहे. कोरोनाचा आकडा पहिल्यांदा ऑक्टोबरनंतर 5 टक्क्यांच्या वर गेला आहे. सरकारने राज्यांना तात्काळ रुग्णालयातील सुविधा आणि इंटेसिव्ह केअर वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. काही आठवड्यातच परिस्थिती खराब झाली आहे. काही राज्यांमुळे चिंतेत वाढ झाली आहे. अशावेळी कोणतंही राज्य किंवा जिल्हा अधिक चिंतेचं कारण बनता कामा नये, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितलं आहे.
कोरोनाची दुसरी लाट धोकादायक आहे. जेव्हा यावर नियंत्रण आलं आहे असं आपल्याला वाटतं तेव्हाच तो हल्ला करतो. केवळ आपल्याच नव्हे तर इतर देशातही हाच प्रकार पाहायला मिळाला आहे, असं पॉल म्हणाले आहेत. जिथे नॅशनल पॉझिटीव्ह रेट 5.65 टक्के आहे, तिथे महाराष्ट्रात हा रेट 23 टक्के आहे. पंजाबमध्ये 8.82 टक्के, मध्यप्रदेशात 7.82 टक्के, तामिळनाडूत 2.50 टक्के आणि कर्नाटकात 2.45 टक्के आहे.
दरम्यान, 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासोबत केंद्र सरकारची उच्चस्तरीय बैठक झाली. ज्या राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत त्यांच्यासोबत ही बैठक झाली. यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, पंजाब आणि बिहारचा समावेश आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली पाच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात कोरोना टेस्टिंग वाढवा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, आयसोलेशन, लसीकरणाची संख्या वाढवा आणि क्लिनिकल ट्रीटमेंटवर लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे.
थोडक्यात बातम्या –
शस्त्रक्रियेनंतर शरद पवार ठणठणीत, फोटो ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या…
राष्ट्रवादीविरोधात केलेली बंडखोरी भोवली, ‘या नेत्याची शिवसेनेतून हकालपट्टी
सिनेमात सेक्स दाखण्यापेक्षा पॉर्न फिल्मच बनवा- गोविंदा
पाणी जपून वापरा! ‘या’ कारणाने पिंपरी-चिंचवडकरांना दोन दिवस मिळणार नाही पाणी
जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता
Comments are closed.