महाराष्ट्र मुंबई

“…तर संजय राऊतांनी राहुल गांधींना सल्ले द्यावे, दोघांची वैचारिक उंची सारखी आहे”

मुंबई | भंडारा येथील रुग्णालयात आग लागल्याने दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सामनामधून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली.

केंद्र सरकारने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसं काम झालं तसं करा, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला. याला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर देत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

उद्धवजी अगदीच लक्ष देत नसतील तर संजय राऊतांनी राहुल गांधींना सल्ले द्यावेत. मोदीद्वेषाचा कॉमन फॅक्टर आहेच. शिवाय दोघांचे विचार आणि वैचारिक उंची सारखी आहे, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय.

इतिहास साक्षी आहे ज्या पत्रकारांनी वैयक्तिक आकस आणि द्वेषातून मोदींचा विरोध केला, जनतेने त्यांचा बाजार उठवला. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, जनता जनार्दनाची सेवा करून तिसाऱ्यांदाही होतील, असं भातखळकर म्हणाले.

 

 

थोडक्यात बातम्या-

बर्ड फ्लूचं संकट मोठं आहे, सरकारने व्यावसायिकांना मदत करावी- देवेंद्र फडणवीस

‘…अन्यथा आम्ही कृषी कायद्यांवर बंदी घालू’; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं

“मोदींनी पक्ष्यांना दाणे खायला घातल्याने पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले”

“बर्ड फ्ल्यू माणसांनाही होऊ शकतो, काळजी घ्या”

मनसेनं सुरु केली ‘पेंग्विन्स गेम्स’ नावाची वेब सिरिज!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या