बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उज्ज्वला गॅस योजनेसाठी इम्पेरीकल डाटा वापरता मग ओबीसींसाठी का दिला जात नाही”

मुंबई | आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. अधिवेशनादरम्यान विविध मुद्यांवरुन विरोधक आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पेरीकल डाटा उपलब्ध व्हावा यासाठी ठराव मांडला. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राचा डेटा ओबीसी आरक्षणासाठी वापरता येणार नाही, असं म्हटलं.

यावर केंद्र सरकारकडून डेटा मिळावा आणि ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून हा डेटा हवा आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं. तसेच उज्ज्वला गॅस योजनेसह इतर अनेक योजनांसाठी सरकार इम्पेरीकल डाटा वापरते. मग ओबीसी आरक्षणासाठी हा डेटा केंद्राकडून का दिला जात नाही?, असा देखील सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी विरोधकांना केला आहे.

दरम्यान, आज अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. ओबीसींच्या मुद्यावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. विरोधकांनी सभागृहात सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केली.

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची देखील माहिती आहे. यानंतर सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं. तसेच आज विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची देखील माहिती मिळाली आहे.

थोडक्यात बातम्या – 

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

ह्रदयद्रावक! तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर कोसळली क्राँक्रीट लिफ्ट, जागीच मृत्यू

नियतीचा खेळ! सासऱ्याचा मृतदेह नेत होता जावई अन्…, एकाच दिवशी माय-लेकी झाल्या विधवा

“विधानसभेच्या काही सदस्यांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या”- भास्कर जाधव

सगळे मरणार, फक्त राजकारणी जिवंत राहणार – प्रविण तरडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More