Top News जळगाव महाराष्ट्र

‘मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो….’; नाथाभाऊंनी केला मोठा गौप्यस्फोट

जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध रंगलं आहे. अशातच नाथाभाऊंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचं कामकाज चालू असताना मला त्यांनी अँटी चेंबरमध्ये बोलावलं. आम्ही दोघंच तिथं होतो त्यावेळी मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो, मी तुमचं राज्यपाल पदासाठी नाव पाठवत आहे, असं चेंबरमध्ये फडणवीस मला बोलले असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांनी त्यासाठी प्रयत्न केले असतील पण तसं काही झालं नाही. राज्यसभेच्यावेळेही माझं नाव सुचवणार म्हणाले मात्र तसं काही झालं नाही. विधान परिषदेलासुद्धा जी 4 नाव दिली गेलीत ती वगळून वेगळीच 4 नाव आलीत. त्यावेळी मी त्यांना म्हटलं जमत असेल तर करा उगाच खोट्या आशा दाखवू नका, असंही खडसेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, 1995 पासून आमच्या नेतृत्वात निवडणूका लढवल्या जात होत्या. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकच निवडणूक लढवली गेली आहे. त्यामुळे कोणती यादी पाठवली जाते आणि कोणती यादी डावलली जाते हे आम्हाला चांगलंच माहित असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

चिंताजनक! पिंपरी- चिंचवड शहरात पुन्हा वाढला कोरोनाचा आकडा

‘मुंबईच्या महापौरांनी SRA सोसायटीतील फ्लॅट बळकावला’; भाजपचा गंभीर आरोप

अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; मुंबई लोकलने करता येणार प्रवास

एनसीबीच्या चौकशीत रियाने ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींची घेतली नावं

देवेंद्र फडणवीसांवर खडसेंनी केलेल्या टीकेला अमृता फडणवीसाचं उत्तर, म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या