वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर विराट-रोहितवर…, कपिल देवची स्पष्ट भूमिका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गतवर्षी झालेल्या वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत इंग्लडनं भारतावर दणदणीत विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार माजी कपिल देव(Kapil Dev) यांनी रोहीत शर्मा(Rohit Sharma) आणि विराट कोहलीबद्दल(Virat Kohali) मोठं वक्तव्य केलं आहे.

कपिल देव म्हणाले आहेत की, वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर ट्रेनर, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते यांना कठीण निर्णय घ्यावा लागणार आहे. वैयक्तिक स्वार्थ मागं सारून आपल्या संघाचा विचार करावा लागतो.

विश्वचषक जिंकण्यासाठी तुमचा रोहित शर्मा किंवा आणखी दोन-तीन खेळाडूंवर विश्वास असेल तर असं कधीही होऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या टीमवर विश्वास ठेवण्याची गरज आहे, असंही कपिल देव म्हणाले आहेत.

काही खेळाडू असंही असतात की ते टीमचा आधार बनतात. परंतु आपल्याला किमान 5-6 खेळाडू तयार करावे लागतील. म्हणूनच माझे म्हणने आहे की, तुम्ही केवळ रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर अवलंबूर राहू शकत नाही, असं मत कपिल देव यांनी व्यक्त केलं आहे.

तसेच पुढच्या काळात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबतही कपिल देव बोलले. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आता एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे, आपल्यापेक्षा परिस्थीती कोणालच माहित नाही, असं कपिल देव एकदिवसीय विश्वचषकाबाबत बोलताना म्हणाले.

विराट-रोहितचा हा शेवटचा विश्वचषक आहे का, असं अनेकजण विचारत असतात. माझा विश्वास आहे की ते खेळू शकतात, परंतु यासाठी त्यांना परिश्रम घ्यावे लागतील. तसेच फिटनेसही महत्वाची आहे, असंही कपिल देव म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-