बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही घाबरणारे नाहीत तर…”; नवनीत राणा आक्रमक

नवी दिल्ली | आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणांच्या (Navneet rana) अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. 13 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर राणा दाम्पत्य बाहेर आले. बाहेर आल्यापासून त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल सुरुच ठेवला आहे.

आज राणा दाम्पत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची दशा झाली आहे. त्यातुन मुक्तता मिळाली पाहिजे यासाठी आम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं होतं. पण आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला, असं रवी राणांनी म्हटलं आहे.

राज्य सरकार सूडबुद्धीनं वागतंय. पण आम्ही घाबरणारे नाहीत तर लढा देणारे आहोत, असं नवनीत राणांनी म्हटलं आहे. मविआ सरकारला जनता धडा शिकवेल, असंही राणा म्हणाले.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची लंका आहे. नवनीत राणा आणि रवी राणा आम्ही युद्धपातळीवर उतरु आणि भ्रष्टाचाराची ही लंका आहे ती भ्रष्टाचारापासून मुक्त करु, असंही राणांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मनसेचा गंभीर इशारा

मोठी बातमी! एमपीएससीकडून ‘इतक्या’ पदांसाठी भरती

‘त्या 28 भाजप नेत्यांची प्रकरणं उघड करणार’; संजय राऊतांचा गंभीर इशारा

राजद्रोहाच्या खटल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!

सोमय्यांना आणखी एक झटका; राऊतांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More