“शिवसेना सोडू नाहीतर दलालाला जोड्यानं मारु”; 19 बंगल्यांबद्दल राऊत संतापले
मुंबई | आज शिवसेना भवनात खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राऊत यांनी अनेक गौप्यस्फोट केल्याचं पहायला मिळालं. विरोधकांवरही तिखट शब्दांत वार केल्याचं पहायला मिळालं.
किरीट सोमय्या यांचा पीएमसी बँक घोटाळ्यात हात असल्याचा आरोप यावेळी संजय राऊत यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. कधीही सांगा आपण चार बस करु आणि आपण त्या 19 बंगल्यात पिकनिकला जाऊ.
जर तुम्हाला ते बंगले तिथं दिसले, तर मी राजकारण सोडेन. आणि नाही दिसले, तर त्या दलालाला जोड्यानं मारा. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपाचा प्रयत्न आहे. पण महाराष्ट्र हा गांडूची औलाद नाही, महाराष्ट्र बेईमान नाही असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या –
“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”
“पुन्हा येताना ते व्हिडीओ घेऊन येणार???”, पत्रकार परिषद संपताना राऊतांचा गौप्यस्फोट
“मुलुंडचा दलाल”; संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांचा असा उल्लेख
“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”
“मला ती लोकं म्हणाली, केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील”
Comments are closed.