बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं अवघड करू”

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवार आणि शनिवारी पुण्यात होते. या दोन दिवसात त्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पुण्यात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांचं तोंडभरून कौतुक केलं. त्यावेळी राज ठाकरे यांनी जातीव्यवस्थेवरून अप्रत्यक्षपणे काही नेत्यांवर टीका केली होती. त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाड यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

राज ठाकरे यांना जसं पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचं आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचे देखील आकलन नाही. राजकारणात कुठेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांनी केली होती. त्यावर आता मनसेने प्रत्त्युतर दिलं आहे.

मी प्रविण गायकवाड, मी प्रविण गायकवाड असं गल्लो गल्ली सांगत फिरताना मी तुला स्वतः पाहिलंय. 2019 ला पुण्यातून लोकसभेला उभा राहायला इच्छूक असणारा तू, तुला काय राज ठाकरे कळणार. लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा इशारा मनसे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी दिला आहे.

दरम्यान, जातीव्यवस्थेवर राज ठाकरे यांनी रोखठोक मत व्यक्त केलं होतं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीवादाचा मुद्दा मोठा झाला, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. जातीचा मुद्दा आता नेत्यांच्या ओळखपत्राचा भाग बनलाय, असंही राज ठाकरे यांनी याआधी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

अफगाणिस्तानात आतापर्यंत काय काय घडलं?, वाचा एका क्लिकवर

चक्क खासदारच विसरले राष्ट्रगीत; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

देश सोडण्यासाठी अफगाणी नागरिकांची धडपड, विमानतळाचे फोटो पाहून हैराण व्हाल

15 ॲागस्टची सुट्टी ठरली दुर्देवी, मुलाच्या डोळ्यादेखत आईनं सोडला जीव

‘…म्हणून मला देश सोडावा लागला’; अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More