‘जर काॅंग्रेस- राष्ट्रवादी सोबत लढलो तर…’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) बाळासाहेब ठाकरेंच्या(Balasaheb Thackeray) जयंतीचे औचित्य साधून युती जाहीर केली. परंतु वंचित बहुजन आघाडी अद्याप महाविकास आघाडीचा भाग बनलेली नाही.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती झाली आहे. आता या निवडणुकांमध्ये शिवशक्ती-भिमशक्ती कमाल दाखवू शकेल की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आता या सगळ्यात प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीबाबत एक सूचव वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जर वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट विधानसभा निवडणुका एकत्र लढले 150 जागा येतील.

पुढं बोलताना आंबेडकरांनी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसबाबतही एक महत्वाचं वक्तव्य केलं. जर आमच्यासोबत काॅंग्रेस- राष्ट्रवादीही आले तर २०० पेक्षा जास्त जागा येतील, असा दावा आंबेडकरांनी केला आहे.

दरम्यान, यावेळी आंबेडकर पुण्यातील एका सभेत बोलत होते. या सभेत बोलताना त्यांनी असंही सांगितलं आहे की, आम्ही महाविकास आघाडीचा भाग होण्यास आम्ही सकारात्मकता दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या-