‘आम्ही दादागिरी केली असती तर…’; संदीपान भूमरे यांचं राजेश टोपेंना प्रत्युत्तर
औरंगाबाद | राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Sarkar) स्थापन केलं आहे. मात्र, तीन पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर अनेकदा वाद पहायला मिळतात. राज्याचे आरोग्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शिवसेनेचे दोन मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी करून त्रास देतात, असा आरोप केला होता. त्यावर आता शिवसेना मंत्री संदीपान भूमरे (Sandipan Bhumare) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आम्ही दादागिरी केली असती तर राजकारणात 35 वर्षे टिकलो नसतो. आपण आजवर सर्वांना सोबत घेऊन राजकारण केले आहे. राजेश टोपे काय बोलले याची कल्पना नाही. आपण कोणत्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पक्षात घेतले नाही, असं संदीपान भूमरे यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीत सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. काही कार्यकर्ते विनाकारण खोट्या तक्रारी करतात, असंही संदीपान भूमरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं स्पष्टीकरण संदीपान भूमरे यांनी दिलं.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आघाडी धर्म पाळावा, असा आवाहन करण्यात येत आहे. संदीपान भूमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याची तक्रार राजेश टोपेंनी केली होती. आपण महाविकास आघाडी धर्म पाळावा, असं आवाहन राजेश यांनी केलं होतं.
थोडक्यात बातम्या-
‘आईनं अॅसिड पिऊन आत्महत्या केली’, मुनव्वर फारूखीचा खळबळजनक खुलासा; पाहा व्हिडीओ
‘एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे’; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
‘राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला तर…’; गृहमंत्र्यांचा गंभीर इशारा
राधे माँच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘या’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका
दिलासादायक ! एसटी कर्मचाऱ्यांसाठी ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
Comments are closed.