बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दिल्लीत हुजऱ्या करणाऱ्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवून देऊ”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्या दिपाली सय्यद भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका केल्याने दीपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातच आता दीपाली सय्यद यांनी अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांबद्दल बोलाल तर पंतप्रधानांची आठवण करून देऊ, दिल्लीत हुजऱ्या करणाऱ्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवून देऊ, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही, असंही दीपाली सय्यद यांनी म्हणाल्या.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही नेत्यांवर आरोप केल्याचं उदाहरणं दिपाली सय्यद यांनी दिली आहेत. किरीट सोमय्यांनी ज्या नेत्यांवर आरोप केले होते त्यांना मोदींनी पक्षात घेतलं. आता ते कारवाईबद्दल बोलत का नाहीत?, असा सवाल दीपाली सय्यद यांनी केला आहे.

दरम्यान, दीपाली सय्यद यांनी माजी मंत्री कृपाशंकर सिंह, माजी मंत्री बबनराव पाचपुते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र या नेत्यांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, असं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘प्रसंगी रक्त सांडवू पण…’; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गंभीर इशारा 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांना धमकी

नारायण राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; पुन्हा नोटीस जारी

“सोनिया गांधींच्या सांगण्यावरून मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला पण…”

‘शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळत असल्याने केंद्र सरकारला पाहवत नाही’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More