PF चे पैसे काढणार असाल तर ही बातमी नक्की वाचा!

EPFO | आपण नोकरी करत असाल तर आपल्या नावावर पीएफ खात्यात पैसे जमा होत जातात. गरज पडल्यास तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF0) खात्यातून पैसे काढू शकता. काही खास परिस्थितीत ईपीएफमधील पैसे काढता येतात. अशा स्थितीत पैशांसाठी अर्ज केल्यानंतर पुढच्या दहा दिवसांत हे पैसे नोकरदाराच्या बँक खात्यात पाठवले जातात. मात्र अर्ज करताना काही त्रुटी आढळल्यास तुमचा पीएफ क्लेम रिजेक्ट केला जातो.

पैशांची गरज असते, पण ईपीएफओ तुमचा क्लेम रिजेक्ट करते, त्यामुळे त्रागाही वाटतो. मात्र  काही गोष्टींची योग्य काळजी घेतल्यास तुमचा हा क्लेम रिजेक्ट होणार नाही.

पीएफ काढताना तुम्ही जी माहिती टाकलेली असते, ती माहिती ईपीएफओ पडताळून पाहते, या माहितीत काही तफावत आढळल्यास तुमचा ईपीएफ क्लेम रिजेक्ट केला जातो. यामुळे क्लेम करताना चुकीची माहिती देऊ नका. नाव, जन्मतारीख, वडिलांचं नाव आदी माहिती योग्य आणि कोणतीही चूक न करता भरणं गरजेचं आहे.

अनेकदा सबस्क्रायबर पीएफ खात्याचा अर्ज करताना बँक अकाऊंटच्या माहितीकडे दुर्लक्ष करतो. अर्ज करताना तुम्ही दिलेल्या बँख खात्याची माहिती योग्य पद्धतीने भरणं गरजेचं आहे. बँक खाते क्रमांक, आयएफसी कोड, ब्रांच डिटेल्स योग्य पद्धतीने भरणे गरजेचे आहे. यात काही तफावत आढळल्यास तुमचा क्लेम रिजेक्ट होतो.

EPFO | ‘या’ गोष्टींसाठी काढता येतात पैसे

स्वतःचे किंवा मुलाचे लग्न असल्यास तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता.
वैद्यकीय गरज असेल तेव्हा देखील तुम्ही पैसे काढू शकता.
घर खरेदी करण्यासाठी तुम्हाला पीएफमधून पैसे काढता येतात.
गृहकर्ज फेडण्यासाठी देखील तुम्ही पैसे काढू शकता.
घराचे नूतनीकरण करण्यासाठी तुम्ही पीएफचे पैसे काढू शकता.

महत्त्वाच्या बातम्या- 

निक्कीच्या आईने अरबाजबद्दलची ‘ती’ गोष्ट सांगताच निक्कीला बसला मोठा धक्का!

पुण्यात बड्या बापांच्या मुलांनी अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक अत्याचार

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर महिलेकडून धक्कादायक प्रकार, सगळीकडे एकच खळबळ!

कॉँग्रेसचा निष्ठावंत नेता हरपला, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन

उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड!