बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लघू-सूक्ष्म का असेना तुमच्याकडे मोठं खातं”; उद्धव ठाकरेंकडून राणेंना कानपिचक्या

सिंधुदुर्ग | चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे समोरासमोर आले होते. त्यावेळी दोघांमध्ये चांगलीच राजकीय टोलेबाजी पहायला मिळाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना नारायण राणे यांनी चिमटे काढले आहेत.

आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना किंवा सुक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करुन द्याल ही तुमच्याकडून अपेक्षा आहे. मी कुठेही पक्षभेद आणत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंच्या कानपिचक्या घेतल्या आहेत.

विकासाच्या कामात मी कोतेपणा आणू शकत नाही. पण पेड्यातला गोडेपणा अंगी बाळगावा लागतो. म्हणून तिळगूळ घ्या गोड बोला असं म्हणतात, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, मला बोलायचं नाही. मला बोलावं लागलं. आताचा आजचा हा क्षण आदळ आपट नाही, तर आनंद व्यक्त करण्याचा आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला, नाहीतर कोणीतरी म्हणेल मीच बांधला”

नारायण राणे मुख्यमंत्र्यांसमोर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…

उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंनी ना एकमेकांकडे पाहिलं, ना नमस्कार केला!

“कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More