बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर समजून जावं नवरत्न तेलाने चंपी करण्याची वेळी आलीये’; मिटकरींची चंद्रकांत पाटलांवर टीका

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. त्यानंतर या वक्तव्याचा निषेध करत पुण्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना थेट नवरत्न तेलाची बाटली पाठवली होती. त्यानंतर या तेलाच्या बाटलीची एकच चर्चा सध्या राजकारणात सुरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.

कोल्हापुरी पायतानाचा प्रसाद मिळाल्यावरही एखादी विकृत व्यक्ती जर बडबडत असेल तर नक्कीच समजून जावं नवरत्न तेलाने चंपी करण्याची वेळ आली आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. ट्विट करत अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी ‘टोपीखालचे संस्कार’ असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदारांच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळं आयुष्य गेलं, कधी 60 वर तो गेला नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांवर कडाडून टीका केली आहे.

दरम्यान, आज संदिप काळे नावाच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना नवरत्न तेलाची बाटली दिली होती. बोलताना जरा डोकं शांत ठेऊन टीका करत जावा, असा सल्ला देखील संदिप काळे यांनी चंद्रकांत पाटलांना दिला होता.

थोडक्यात बातम्या-

‘मला टाॅपलेस पंतप्रधान व्हायचंय’; तरूणीने व्यक्त केली अजब इच्छा

‘चला हवा येऊ द्या’ मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानं सोडला शो; चाहत्यांना मोठा धक्का

युएईत रंगणार वर्ल्ड कपचा थरार; पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

‘माझं शरद पवारांना आव्हान आहे की…’; किरीट सोमय्यांचं पवारांना खुलं आव्हान

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी सानिया मिर्झाचा मोठा निर्णय! व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More