बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदीजी म्हणतील, मैं संजय राऊत के सामने रहता हूँ”

पुणे | पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा आज रविवारी जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संजय राऊतांनी शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करताना तुफान फटकेबाजी केली आहे. राजकारणातील आगामी काळातील शिवसेनेची महत्त्वकांक्षा राऊतांनी बोलावून दाखवली आहे.

मी दिल्लीत अनेक वर्षांपासून सफदरजंग लेनला राहतो. सफदरगंज दिल्लीतील सर्वात प्रतिथयश भाग आहे. मी माझा पत्ता सांगताना नरेंद्र मोदी माझ्या घरासमोर राहतात. रस्ता ओलांडला की, नरेंद्र मोदी समोरच राहतात. ही सर्व शिवसेनेची कृपा आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढं बोलताना राऊत म्हणतात की, देशाच्या एवढ्यामोठ्या राजधानीत इथकी मोठी लोकं आपल्याला ओळखतात. मी सांगतो नरेंद्र मोदीजी के घरके सामने रहता हू, अगर उनको पूछो मोदीजी को तो वह कहेंगे की मैं संजय राऊत के सामने रहता हूँ, असं मिश्किलपणे राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, महापालिकेत कोणत्या पक्षाचे कितीही आकडे आले तरी महापौर आपलाच होणार आहे. मी म्हणत नाही की, आपण 100 जागा जिंकू. मी आधी म्हणल्याप्रमाणे 56 आमदार असणारे मुख्यमंत्री होऊ शकतात तर, 45-45 नगरसेवक असणारे महापौर व्हायलाच पाहिजेत, असं राऊतांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“अजित पवारांना सांगू आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत”

“केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याला ईडीची नोटीस येणं, ही फॅशनच झालीये”

“अजूनही मनुवादी जिवंत असल्यानं ओबीसी आरक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला जातोय’”

“भाजपसारख्या नीचपणाच्या, असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार”

गेली 70 वर्षे ‘या’ मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच पक्षाची सत्ता येते

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More