मुंबई | महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास अनेक मोठे फायदे मिळतात. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ आणि करातून सूटही मिळते. महिलांना कायमच मोठी सूट मिळते. त्यामुळे महिलांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक मोठा भाग करमुक्त असतो.
महिलांना घरे खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून राज्यस्तरावर अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लोअर इनकम ग्रुप किंवा इकोनॉमिक विकर सेक्शन कॅटेगरी अंतर्गत अनुदान घेण्याकरीता घरातील एका महिलेला मालकी देणं बंधनकारक आहे.
तुम्ही घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज काढत असाल तर महिलांसाठी तुलनेने कमी व्याजदर असतो. भारतीय स्टेट बँकेत महिलांना गृहकर्जावर इतरांपेक्षा 0.5 टक्के कमी व्याजदर आहे.
दरम्यान, जर तुम्हाला एसबीआयच्या योनो सेवेअंतर्गत गृहकर्ज घ्यायचे असेल, तरीही तुम्हाला 5 बीपीएस व्याज सवलतीचा लाभ मिळेल. एसबीआय होम लोन व्याजदर 6.70 टक्के आहे. 6.70 टक्के आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना 6.70 टक्के व्याजदराने 30 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज देत आहे.
थोडक्यात बातम्या-
“इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि तुम्ही नाव कसलं बदलता”
“नागरिकांना कोरोना लसीचे दोन डोस उपलब्ध करून देणं सरकारचीच जबाबदारी”
महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर
‘लष्करात भरती करुन आम्हालासुद्धा देशसेवेची संधी द्या’; तृतीयपंथियांची पंतप्रधानांकडे मागणी
केंद्रात काही नेते फक्त भाषणं देतात, गडकरी प्रामाणिकपणे काम करतात- बच्चू कडू
Comments are closed.