बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कायदा हातात घेण्याचे धाडस केल्यास…’; अजित पवारांचा राज ठाकरेंना गंभीर इशारा

मुंबई | राज्यात भोंग्याच्या मुद्द्यावरुन वातावरण जोरदार पेटलं आहे. मनसे अध्यक्ष यांनी भोंग्यावरुन 4 तारखेचा अल्टिमेटम दिला होता. अल्टिमेटमनंतर काल मनसैनिकांनी अनेक ठिकाणी आंदोलनं केलेली पहायला मिळाली. यासोबत बऱ्याच ठिकाणी हनुमन चालीसा पठन देखील करण्यात आली. त्यामुळे राज्यात एकच गोंधळ उडालेला पहायला मिळालं.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेण्याचे कुणी धाडस केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

कुणीही उग्र आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई होईलच, असंही अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता सरकार काय पावलं उचलतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज्यात जोदार गदारोळ पहायला मिळत आहे. त्यामुळे वातावरण ढवळून निघालं आहे. आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा कायम असलेला पहायला मिळतोय.

थोडक्यात बातम्या – 

Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा एका क्लिकवर

मोठी बातमी! आणखी एक सरकारी कंपनी विकण्याचा मोदी सरकारचा निर्णय

“मशिदींवरील भोंगे काढायला सांगितले म्हणून हिरव्या उचक्या लागल्या”

“ज्यांच्यात क्षमता आहे असं वाटायचं त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचे राजकारण सुरू केलं”

“…तर MIM देखील गप्प बसणार नाही, बघू आम्हाला कोण थांबवतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More