बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मिळू शकतात ‘इतके’ लाख रूपये

दिसपुर | आपल्याकडे लग्न हा खूप मोठा सोहळा आहे पण तोच आंतरजातीय लग्न सोहळा (Intercast Marriage) म्हटलं की कुटुंबीय अनेकदा नाक मुरडतात. पण आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला आता राज्य सरकार त्यांच्या नवीन योजनेच्या अंतर्गत तब्बल 5 लाख रूपये देणार आहे.

आसाम राज्य सरकारने (Assam State Goverment) त्यांच्या आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना व्ययवसाय सुरू करायला मदत करणार आहे. सामाजिक सलोख्याला चालना देण्यासाठी आसाम सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार कोणताही व्यवसाय करण्यासाठी 10 हजार ते 5 लाख रूपये देणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटीचं पालन करावं लागणार आहे. यातील महत्वाची अट म्हणजे, पत्नी किंवा पत्नी या दोघांपैकी एक कोणीतरी अनुसुचित जातीचा तर दुसरा जोडीदार सामान्य जातीचा असणं ही बंधनकारक आहे. (Assam Goverment’s Intercast Marriage Plan)

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनूसार, योजनेेच्या लाभार्थींचे लग्न एप्रिल 2019 ते मार्च 2021 या कालावधीत झालेले असणं गरजेचं आहे. तसेच या जोडप्याचं वार्षिक उत्पन्न 5 लाख रूपयांच्या आत असणेही बंधनकारक आहे.

थोडक्यात बातम्या-

देशात सतर्कतेचं वातावरण, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर राहणार विशेष लक्ष

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला WHO नं दिलं ‘हे’ नाव, शास्त्रज्ञांकडून धोक्याची घंटा

‘कोई सहरी बाबू दिल-लहरी बाबू हाय रे’ गाण्यावर रोहित, श्रेयश आणि शार्दुलचे जोरदार ठुमके, पाहा व्हिडीओ

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळेंना उच्च न्यायालयाचा दणका; दिले ‘हे’ आदेश

नाना पटोले यांनी गडकरींविरोधात दाखल केलेल्या याचिकेबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More