बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लग्नाला नाही बोलवलं एकवेळ चालेल पण लग्नानंतर नाही बोलावलं तर…’; कंडोम कंपनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

मुंबई | बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेली लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrnina Kaif). काल 9 तारखेला ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्या दोघांचीच हवा पहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर विकी-कतरिनाच्या (Vicky Kattrina) लग्नाचा बोलबाला पहायला मिळत आहे. या लग्नाला अगदी मोजकीच लोकं आमंत्रित असल्यानं बाकीचे लोक सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. मोजक्यात लोकांना लग्नाला बोलावल्यामुळे त्यांच्या वर मीम्सचाही पाऊस पडतोय. यातच ड्युरेक्स या कंडोम बनवणाऱ्या कंपनीनं एका हटके अंदाजात कतरिना आणि विकीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ड्युरेक्स कंडोम कंपनीनं सोशल मीडियावर एक हटके पोस्ट करत विकी-कतरिनाला शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नाला आम्हाला बोलवायला विसरलात ते एकवेळ चालेल पण….लग्नानंतर नाही बोलावलं तर…., असं म्हणत कंडोम कंपनीनं हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर विकी-कतरिनाच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. लग्नानंतर आता विकी आणि कतरीना उद्या मुंबई विमानतळावरून थेट मालदीवला हनीमूनला रवाना होणार आहेत. त्यांचे चाहतेही त्यांच्यासाठी आनंदी असल्याचं पहायला मिळत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Durex India (@durex.india)

थोडक्यात बातम्या – 

“चंद्रकांतदादा, अडवाणींना विचारून घ्या महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचं बोट…”

आज इंधनदरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

पोलिसांची मुजोरी! कडेवर चिमुकला तरीही बापाला पळू-पळू मारलं; पाहा व्हिडीओ

बंपर ऑफर! iPhone 12 Pro वर मिळतोय सर्वात मोठा डिस्काउंट

चिंताजनक! पुणे-मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा; ‘ही’ गोष्ट ठरतेय कारणीभूत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More