‘हे’ उपाय केल्यानं हिवाळ्यातही त्वचा दिसेल चमकदार
मुंबई | आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटत असते. पण हिवाळ्यात(Winter) त्वचा कोरडी पडल्यानं त्वचेवरील चमक(Skin Glow) निघून जाते. अशा वेळी काहींना महागड्या क्रीम वापरूनही फरक पडत नाही. पण जर तुम्ही काही टीप्स फाॅलो केल्या तर हिवाळ्यातही तुमची त्वचा चमकदार दिसेल.
थंडीमध्ये आपल्या त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होत असते, त्यामुळं त्वचा आपोआप कोरडी पडत असते. यात आपण जर साबणाचा जास्त वापर केला तर, त्वचा जास्तच कोरडी पडू शकते, त्यामुळं हिवाळ्यात साबणाचा वापर जास्त करू नये. अंघोळीनंतर माॅइश्चराइजर आठवणीने लावावे.
थंडीमध्ये अल्कोहोल असलेल्या क्रीम, टोनरचा वापर करणं टाळावं. यामुळं त्वचेवर रॅश येऊ शकतात. थंडीमध्ये गुलाबपाणी आणि ग्लिसरीनयुक्त टोनरचा वापर करावा.
तुम्ही बेसन पीठात थोडी हळद घालून त्यात गुलाबपाणी घालावं. याचा लेप चेहऱ्याला लावल्यास चेहरा क्लीन होतो. आठवड्यातून दोनदा हा लेप लावल्यास हळू हळू चेहरा नितळ दिसतो.
त्वचा कोरडी पडू नये किंवा कोरडी पडल्यानंतर तुम्ही निरसं दुधाचा वापर करून त्वचेला मुलायम बनवू शकता. निरसं दुधात कापूस बुडवून ते संपूर्ण चेहऱ्यावर लावावे. नंतर पाण्यानं चेहरा धुवावा.
तसेच खोबरेल तेलाचा वापर करून देखील तुम्ही त्वचा चमकदार ठेवू शकता. अंघोळीला जाण्यापूर्वी खोबरेल तेलानं मालिश करावी. असं केल्यास हिवाळ्यातही दिवसभर त्वचा चमकदार राहू शकते. या सगळ्या टीप्स बरोबरच तुम्ही शरीराला हायड्रेट करणारा आहार घेणंही महत्वाचं आहे. तसेच दिवसातून कमीत कमी आठ ग्लास पाणी प्या.
महत्वाच्या बातम्या-
- ‘राजभवनाच्या बाहेर उभं राहून देता का शिव्या?’; संजय राऊतांचं शिंदे गटाला आव्हान
- नवीन सिमकार्ड घेतल्यानंतर आता ‘हा’ नियम होणार लागू
- काळजी घ्या! पुण्यातील ‘या’ परिसरात आढळला झिका व्हायरसचा रुग्ण
- “राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टकमक टोकावरून फेकून द्यावं”
- राणा दा-पाठक बाईंच्या रिसेप्शन पार्टीची होतेय जोरदार चर्चा
Comments are closed.