Top News देश

‘कोरोना लसीवर विश्वास नसेल तर पाकिस्तानात निघून जावं’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली | केंद्र सरकारकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला मंजुरी दिल्यानंतर आता 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम संपूर्ण देशभरात राबवली जाणार आहे. मात्र कोरोना लसीवर मुस्लिम समाजाकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुद्यावरुन उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सरधानाचे भाजप आमदार संगीत सिंह सोम यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

कोरोना लसीवर विश्वास नसेल, तर पाकिस्तानात निघून जावे, असं संगीत सिंह सोम यांनी म्हटलं आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

संगीत सिंह सोम म्हणाले की, “कोरोना लसीकरणावर उपस्थित केले जाणारे प्रश्न दुर्दैवी आहेत. देशातील काही मुस्लिम बांधवांना कोरोना लसीवर विश्वास नाही. त्यांचा शास्त्रज्ञ, पोलीस आणि पंतप्रधानांवरही विश्वास नाही. त्यांना पाकिस्तान अधिक जवळचा वाटतो. त्यामुळं कोरोना लसीवर विश्वास नसेल, तर पाकिस्तानात निघून जावे. मात्र, शास्त्रज्ञांच्या मेहनतीवर शंका घेऊ नये.”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले आहे. पहिल्या टप्प्यातील कोरोना लस ही आरोग्य कर्मचारी यांना देण्यात असून, याचा खर्च केंद्र सरकारकडून केला जाणार आहे.

थोडक्यात बातम्या-

धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

…यावरून शेतकरी कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलनासाठी बसले हे स्पष्ट होतं- हेमा मालिनी

“मुस्लिम चार विवाह करतात, धनंजय मुंडेंनी दोन केले तर काय बिघडलं?”

ड्रग्स प्रकरणी राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जावयाला एनसीबीकडून समन्स

गुजरातच्या मंदिरांमध्ये भाविकांना ‘साष्टांग नमस्कार’ घालण्याची परवानगी नाही तर…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या