बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना नियमांचं पालन न केल्यास भरावा लागणार ‘इतक्या’ हजारांचा दंड

परभणी | कोरोनाचं सावट हळूहळू कमी होत चाललं आहे. त्यामुळे कोरोना नियमांमध्येही शिथिलता करण्यात आली आहे. मात्र लोक या कोरोना नियमांचा फज्जा उडवताना दिसतायेत. सार्वजनिक ठिकणी जमाव करत आहेत. त्यामुळे पुन्हा कोरोना वाढण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. अशातच आता परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सोमवारपासून सुधारित मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत.

कोरोना नियमांमध्ये होणारा निष्काळजीपणा पाहून कोरोना नियमाचं पालन न करणाऱ्याकडून 5 हजारांचा दंड आकारला जाईल, असं जिल्हा प्रशासनानं नमूद केलं आहे. त्यामुळे आता कोरोना नियमांमध्ये हलगर्जीपणा चांगलच अंगलट येणार आहे.

दुकाने, कार्यालये, औद्योगिक सेवा, उपहारगृहे, बार व मॉल मालक व त्यांच्या आस्थापनांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण असणं बंधनकारक आहे. तसंच ग्राहकांनीही लसीकरण केलेले असावं. सोमवारपासून लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये या गोष्टींचा समावेश आहे.

दरम्यान, मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, सॅनिटायझर वापरनं सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणं बंधनकारक आहे. त्यामुळे कोरोनाची लाट रोखून आपण येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेला रोखू शकतो.

थोडक्यात बातम्या  – 

बिग बॉसच्या दोन भागांसाठी मांजरेकरांना मिळतात इतके लाख; मानधन ऐकून व्हाल थक्क

केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं इंधन दरवाढीचं कारण, म्हणाले…

SBI ने शेतकऱ्यांसाठी आणली नवी योजना; होणार ‘हा’ मोठा फायदा, वाचा सविस्तर

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे उघडण्याचा मुहूर्त अखेर ठरला; ‘ही’ असणार नवी नियमावली

IPL 2021: पराभवानंतर विराट कोहलीला अश्रू अनावर, पाहा भावूक व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More